Annoucements & Upcoming Events
!! डरहम मराठी मंडळ टोरोंटो तरफे हार्दिक स्वागत !!
पोटासाठी भटकत जरी दूर देशी फिरेन,
मी राजाच्या सदनी अथवा घोर रानी शिरेन ।
नेवो नेते जड तनुस या दूर देशास दैव,
राहो चित्ती प्रिय मम परि जन्मभूमी सदैव
एकत्र येणे हि सुरुवात
एकमेकांसोबत राहणे हि प्रगती
आणि एकमेकांसोबत काम करणे
म्हणजे यश
डरहम मराठी मंडळ टोरोंटो ही ना-नफा संस्था आहे. डरहम मराठी मंडळाची स्थापना टोरोंटो महानगरीच्या पुर्वेकडील डरहम प्रांतातल्या मराठी भाषिकांना आणि आसपासच्या परिसरा मध्ये राहणाऱ्या मराठी जनांना एकत्र आणण्यासाठी आणि जोडण्याचा उद्देशाने झालेली आहे.
वासुदेव शास्त्र्यांच्या या पंक्तिंप्रमाणे जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी मराठी माणसाची नाळ घट्टपणे मराठी संस्कृतीशी जोडलेली असते. आपल्या जवळच्या भागातील इतर मराठी कुटुंबांसोबत जोडणे, सणवार साजरे करणे, कार्यक्रमात सहभागी होणे याची भूक कोणाला नसेल?
डरहम मराठी मंडळ टोरोंटो हे डरहम भागातील आणि आसपासच्या परिसरा मध्ये राहणाऱ्या मराठी बंधु-भगिनींना एकत्र येण्यासाठी स्थापन केलेले व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर मंडळामार्फत विविध सण-समारंभ आणि त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या व्यतिरिक्त, मराठी ग्रंथालय, मराठी शाळा अश्या अनेक उपक्रमांत मंडळातील सदस्य सहभागी आहेत. उत्तरोत्तर अधिकाधिक कार्यक्रम व उपक्रम मंडळातर्फे आयोजित करण्याची व त्यायोगे मराठी भाषिकांचा सांस्कृतिक वारसा जोपासण्याची मंडळाची इच्छा आहे.
डरहम भागात आज स्थायिक असलेल्या व स्थायिक होवू इच्छिणार्या सर्व मराठी जनांना डरहम मराठी मंडळात सहभागी होण्याचे आवाहन मंडळ करीत आहे.
DMM Sankranti Haldi kunku 2025 registration open